गंगापुरात जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Foto
आमदार प्रशांत बंब यांच्याकडून तत्काळ निपटारा

गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दरबाराचे अध्यक्षस्थान आमदार प्रशांत बंब यांनी भूषविले. दरम्यान, शेकडो तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात आला.

जनता दरबारात पाणी, वीज, रस्ते, महसूल तसेच विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांनी मोठ्या संख्येने आपापल्या तक्रारी मांडल्या. आमदार बंब यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अनेक प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली.

यावेळी आमदार बंब यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. जनता दरबारामुळे सामान्य नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळत असून, त्यांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, अक्षय भालेकर, नायब तहसीलदार मोरे, कृषी अधिकारी प्राजक्ता रनसिंग, तालुका आरोग्य अधिकारी रंगनाथ तुपे, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष
या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत स्तुत्य असून, यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत असल्याचे दिसून येते. 

आमदार प्रशांत बंब यांनी घेतलेली तत्पर भूमिका आणि अधिकाऱ्यांना दिलेले स्पष्ट निर्देश यामुळे नागरिकांचा शासन व्यवस्थेवर विश्वास अधिक दृढ होत आहे. अशा उपक्रमांमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळत असून, त्यांच्या दैनंदिन अडचणी जलदगतीने मार्गी लागत आहेत, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. जनता दरबारामुळे आमच्या समस्या थेट आमदार प्रशांत बंब आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या. अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा झाल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला. यापूर्वी कार्यालयीन प्रक्रियेमुळे कामे रखडत होती, मात्र या दरबारामुळे ती जलदगतीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

रविंद्र चव्हाण, शहराध्यक्ष मारुती खैरे, प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, राजेंद्र राठोड, नगरसेवक राकेश कळसकर, आनंद पाटील, कृष्णकांत व्यवहारे, डॉ. आबासाहेब शिरसाट, रज्जाक शेख, अतुल रासकर आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.